
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशात लोक आपल्या घरात थांबले आहेत. सर्व उद्योगधंदेही बंद ठेवण्यात आले आहे. परंतु गुजरातच्या सूरत शहरात लॉकडाऊनमध्येही मजुरांकडून काम करून घेण्यात आले. तसेच त्यांना घरी जाऊ देत नसल्याने त्यांनी सूरतमध्ये ठिय्या आंदोलन केले आहे.
Gujarat: Labourers protested and pelted stones at the office of Diamond Bourse in Surat, alleging that they were made to work amid #CoronavirusLockdown. Workers also demanded that they be sent back to their native places. pic.twitter.com/RmOVZaRumZ
— ANI (@ANI) April 28, 2020
सूरतमधील डायमंड बुश कार्यालयाच्या बाहेर मजुरांनी आंदोलन केले, तसेच दगडफेकही केली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि संपूर्ण स्थिती ताब्यात घेतली. आम्हाला आमच्या गावी पाठवा अशी भुमिका उपस्थित मजुरांनी घेतली.
गुजरातमधील ही पहिली घटना नसून या पूर्वीही गुजरातमध्ये लॉकडाऊनदरम्यान मजूर अशा प्रकारे एकत्र जमले होते. आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी अशाच प्रकारे आंदोलन केले होते. 24 मार्च रोजी जेव्हा लॉकडाऊन जारी करण्यात आले होते तेव्हा दिली-हरयाणा-उत्तर प्रदेशच्या सीमांवरही अशाच प्रकारे हजारो मजूर जमा झाले होते. परराज्यात अडकलेल्या राज्यात मजुरांना आपल्या गावी परत आणण्याची काहीतरी व्यवस्था करावी, धोरण ठरवावे अशी मागणी राज्यांनी केली आहे.

























































