
अमेरिकेत सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. या दरम्यान झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी एका उमेदवाराच्या डोक्यावर माशी बसल्याने नेटकऱ्यांनी त्याला तुफान ट्रोल केलं आहे.
या नेत्याचं नाव माईक पेंस असं आहे. माईक हे उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यांची लढत कमल हॅरिस यांच्याशी होणार आहे. बुधवारी झालेल्या एका जाहीर सभेवेळी मात्र त्यांच्या विरोध उमेदवाराऐवजी एका माशीमुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे. त्याचं झालं असं की, निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असलेल्या जाहीर वादविवाद सभेत माईक बोलत होते. ही सभा येथील यूटामधल्या सॉल्ट लेक सिटीमध्ये सुरू होती. इथे हॅरिस आणि माईक यांच्यात वादविवाद सुरू होता. माईक बोलायला उभे राहिले आणि त्यांनी मुद्दे मांडायला सुरुवात केली, तोच त्यांच्या डोक्यावर एक माशी येऊन बसली.
पेंस यांना डोक्यावरच्या माशीची अजिबात कल्पना आली नाही. त्यांनी आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं. यावेळी कॅमेऱ्यांचं लक्षही पेंस यांच्यावर केंद्रित असल्याने कॅमेऱ्यांमध्ये ते दृश्य चित्रित झालं. या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी तुफान टोलेबाजी सुरू केली. अनेकांनी पेंस यांच्या संपूर्ण पांढऱ्या केसांची खिल्ली उडवली. इतक्या पांढऱ्या पृष्ठभागावर काळी माशी उठून दिसतेय, असं काहींनी म्हटलं. तर वंशद्वेष आणि वर्णद्वेषाच्या आरोपांचं खंडन करणाऱ्या माईक यांच्या डोक्यावर माशी त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठीच बसली आहे, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. तर काहींनी थेटपणे माईक यांचा अपमान करत माशांना कचरा आवडतो, असंही म्हटलं.
https://twitter.com/bubbaprog/status/1314029118279897089
हे लोण वाढून इतक वाढलं की थोड्यावेळाने ट्विटरवर माईक पेंस यांच्या नावाने हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला. सहसा एका जागी स्थिर न बसणारी माशी पेंस यांच्या डोक्यावर बराच काळ कशी काय बसून होती, याचंही आश्चर्य नेटकऱ्यांनी व्यक्त केलं. तसंच इतका महत्त्वाचा कार्यक्रम असताना जागेचं पेस्ट कंट्रोल का केलं नाही, असाही प्रश्न काहींनी विचारला आहे.
Gayle King: “it was very telling that a fly landed on Mike Pence’s head when he was denying America’s systemic racism. The fly was like ‘say whaaat?’” 😳
— Megyn Kelly (@megynkelly) October 8, 2020
https://twitter.com/JillFilipovic/status/1314032686986649601



























































