Pahalgam Terror Attack- पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण, एनआयएचा मोठा खुलासा

Security personnel maintain vigil near Dal Lake amid high alert following Pahalgam terror attack
(Photo: PTI)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, एनआयए या हल्ल्याचा तपास करत आहे. दरम्यान, एक मोठा खुलासा झाला करण्यात आलेला आहे. दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आल्याचे समोर आले आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) कमांडोसारखे प्रशिक्षण देण्यात आले होते. आता तपास यंत्रणांचे लक्ष एसएसजी प्रशिक्षण घेतलेल्या या कमांडरना शोधण्यावर आहे. सध्याच्या घडीला कश्मीर खोऱ्यात असे 15-20 कमांडर आहेत.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा उद्देश भारतीय सुरक्षा दलांना मोठे नुकसान पोहोचवणे आहे. यापूर्वी तीन मोठ्या हल्ल्यांमध्ये एसएसजी कमांडोची भूमिका आढळून आली होती. त्यामुळे आता तपास यंत्रणांचे लक्ष या एसएसजी प्रशिक्षित कमांडरना शोधण्यावर आहे. यासोबतच, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, आता सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत, जम्मू आणि कश्मीर पोलिस दहशतवादाला सहानुभूती देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. अलिकडच्या काळात कश्मीरमध्ये 100 हून अधिक दहशतवाद समर्थकांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

कुपवाडा प्रदेशात 15, हंदवाडा 12, पुलवामा येथे 14 जणांवर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरग्राउंड चौकशीच्या आधारे तपास यंत्रणेला महत्त्वाचे पुरावे मिळाल्यानंतर या कारवाईचा वेग वाढला आहे.

22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात निःशस्त्र लोकांना लक्ष्य करण्यात आले. सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 जणांना ठार मारले होते, यात बहुतांशी पर्यटकांचा समावेश होता. यानंतर आता भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. तसेच, दहशतवादाचा नायनाट करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.