
बेकायदा वृक्षतोडीमुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि उद्ध्वस्त होणारी वनसंपदा जतन करण्यासाठी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावातील बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले एक लाख बीजगोळे गावाशेजारच्या डोंगरांमध्ये टाकण्यात आले. या उपक्रमात साऱ्या गावानेच सहभाग नोंदवला. जागतिक कृषी दिनाचे औचित्य साधून ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सरपंच रवींद्र माने यांनी सांगितले.
केली जात असतानाच, आता जंगलात आणि वनहद्दीतही वृक्षसंपदा वाढली पाहिजे. यासाठी बीजगोळे तयार करण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यशाळा आयोजित | केली होती. गावातील महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी बीज संकलनाची मोहीम हाती घेतली.
गाव परिसरात असलेल्या चिंच, जांभूळ, हेळा, साग, पेरू, चिक्कू, शिवरी आदी देशी प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे संकलन केले. त्यानंतर बीज योग्य पद्धतीने सुकवून सेंद्रिय खतमिश्रित मातीपासून गोळे तयार करण्यात आले. चार महिने सुकवलेले बीजगोळे गावाशेजारी असलेल्या डोंगरात मंगळवारी सकाळी टाकण्यात आले. यामध्ये गावातील महिला बचत गटाच्या महिला, पुरुष, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.
लाखो वृक्षनिर्मितीचा संकल्प
देशी प्रजातीच्या वृक्षांच्या जाती दिवसेंदिवस नष्ट होऊ लागल्या आहेत. त्याचे संकलन आणि संगोपन झाले पाहिजे. पर्यावरणीयदृष्या गरजेचे असलेले वृक्ष जतन करण्यासाठी दरवर्षी एक लाख बीजगोळ्यांच्या माध्यमातून ही चळवळ कायम ठेवण्याचा निर्धार येथील महिलांनी केला असल्याचे सांगण्यात आले.
संकलन केंद्र ते वृक्षनिर्मिती…
येथील बचत गटाच्या महिलांनी बीजसंकलन केंद्र उभारले असून, त्याठिकाणी देशी प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे संकलन केले जाते. यासाठी महिलांमध्ये स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त बिया संकलित करण्यात येतात. या संकलन केंद्राचे नामकरण ‘वसुंधरा बीज संकलन केंद्र’, असे करण्यात आले आहे.
गावातील महिलांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सरिता पवार आदींचे मार्गदर्शन लाभले.
– रवींद्र माने, सरपंच, मान्याचीवाडी.