
सोशल मीडियामुळे कधी काय व्हायरल होईल आणि कोणाचा रातोरात प्रसिद्धी मिळेत हे सांगता येत नाही. सध्या अशीच एक तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून तिच्या साधेपणावर व निरागस हास्यावर नेटकरी फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर या तरुणीच्या व्हिडीओवर लाखो लाईक्स येत आहे. आता तुमच्याही मनात ही तरुण कोण? कुठली? असा सवाल येत असेल, तर चला जाणून घेऊ.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती तरुणी मूळची पाकिस्तानची असून तिचे नाव अमिना रियाझ असे आहे. 15 वर्षी अमिना कराचीजवळील ग्रामिण भागात राहते. अत्यंत साधारण जीवन जगणाऱ्या या तरुणीची सोशल मीडियावर मात्र क्रेझ दिसून येतेय.
अमिनाच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने तिचे चपाती बनवतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहे. अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमिनाची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकारांनी तिला गाठण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिच्या घरच्यांनी याला परवानगी दिली नाही.
3 लाख फॉलोअर्स
दरम्यान, इन्स्टाग्रामवर अमिना नावाचे एक अकाउंटही असून याचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे अमिनाचे अधिकृत अकाउंट नाही, मात्र तिचे सर्व व्हिडीओ या अकाउंटवर उपलब्ध आहेत.



























































