सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला रवाना

4966

राज्य मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे सोमवारी सकाळी नांदेडहून मुंबई येथे रवाना झाले आहेत. रविवारी सायंकाळी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना सोमवारी मुंबईला नेण्यात आले असून सायंकाळी 7 च्या सुमारास ते मुंबई पोहोचतील.

 काही दिवसांपासून ते होम क्वारंटाईन होते. राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांनाही ताप व न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. महिनाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे काही दिवसांपासून होम क्वारंटाईन होते. रविवारी त्रास वाढल्यानंतर त्यांना उपचारासाठी आशा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या