भाजपमधील अनेकजण परतीच्या वाटेवर – बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रात 2019मधील विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेकजण भाजपमध्ये गेले. पण महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले नाही. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सांगतले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, खडसे यांचे भाजपसाठी मोठे योगदान आहे. 2014 मध्ये भाजपला विजयी करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पण त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाला. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. भाजपमध्ये अनेकांची अवहेलना झाली पण खडसे यांना ती सहन झाली नाही, म्हणून त्यांनी भाजप सोडला. आता खडसे यांनी भाजप सोडल्यावर अनेकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आणि अस्वस्थ झालेले अनेकजण भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या