वंदे मातरम बोलण्यास नकार देणाऱ्याला देशात राहायचा अधिकार नाही, भाजप नेत्याचे वक्तव्य

773

लोकसभा निवडणुकीवेळा सायकलवरून प्रचार करणारे आणि निवडून आल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रीपदावर निवड झालेले प्रताप चंद्र सारंगी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. वंदे मातरम बोलण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला देशात राहायचा अधिकार नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी केले आहे. गुजरातमधील सुरत येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी देखील सारंगी यांनी भुवनेश्वर येथे एका सभेत असेच वक्तव्य केले होते.

यावेळी त्यांनी देशात नारिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर देखील टीका केली आहे. ‘नागरिकत्व कायदा देशात लागू करून आपण काँग्रेसने फाळणी करून केलेल्या पापाचे प्रायश्चित करूया’, असे देखील सारंगी यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या