
पुणे शहर परिसरातील विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे तब्बल 18 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शहर परिसरात जबरदस्तीने मोबाईल हिसकावणे, पीएमपीएल प्रवासात मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः गर्दीच्या आणि जास्त गर्दी असलेल्या पीएमपीएल स्थानकावर हे प्रकार अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांकडून हद्दीमध्ये गस्त वाढविण्यात आली होती.
या दरम्यान शिवाजीनगर बस स्टॅण्ड परिसरात पाठीवर बॅग घातलेला तरूण चालत्या बसमध्ये चढून काही अंतरावर लगेच उतरत असून त्याच्या हालचाली संशयीत असल्याची माहिती हवालदार रणजित फडतरे यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून शिवाजीनगर स्टॅण्ड येथून अल्पवयीन तरूणाला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता चोरीचा एक मोबाईल आढळून आला. त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शहरातील विविध भागातून तब्बल 17 मोबाईल चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 31 हजार रुपये किमतीचे एकूण 18 मोबाईल जप्त केले आहेत. अल्पवयीन मुलाची आर्ई ही महापालिकेत झाडूकाम करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरिंवद माने, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत वाळकोळी, रणजित फडतरे, अविनाश भिवरे, बशीर सय्यद यांच्यासह पथकाने केली.



























































