
सामना प्रतिनिधी, मुंबई
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी कांदिवली परिसरात घडली. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. कांदिवली पूर्वच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत मुलगी कुटुंबासह राहत होती. ती इयत्ता दहावीत होती. काही दिवसांवर तिची बोर्डाची परीक्षा होती. अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे ती चिंताग्रस्त होती. बुधवारी सायंकाळी तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी तिचे नातेवाईक घरी आले तेव्हा हा प्रकार उघड झाला. नेमके कोणत्या कारणावरून तिने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.




























































