परीक्षेला गेलेल्या अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीस पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

रेणापूर येथील रुपचंद नगर येथील आश्रमशाळेत परीक्षेसाठी आलेल्या महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणापूर पोलीस ठाण्यात बळीराम भुजंग गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता त्यांनी त्यांच्या मुलीला १२ वी कला शाखेची ग्रंथालय शास्त्र या विषयाची परीक्षा असल्याने रेणापूर येथील रुपचंद नगर येथील आश्रम शाळेच्या सेंटरवर सोडले. सायंकाळी ५ वाजता परीक्षा संपली त्यामुळे तिला घेऊन येण्यासाठी त्यांनी त्यांचा पुतण्या लक्ष्मण गायकवाड यास परिक्षा केंद्रावर पाठवले होते. मात्र ती परिक्षा केंद्रावर आढळून आली नाही. त्याने ही माहिती फोनवरुन चुलत्यांना कळवली. मुलीचा शोध नातेवाईकांसह सर्वत्र घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.