
सामना प्रतिनिधी । जळगाव
किनगाव हद्दीतील धसवाडी येथील अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचे पाहुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या बाबत किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धसवाडीतील एक १४ वर्षाची मुलगी शाळेत जात असताना शेजारी राहणारा संभाजी मरपवाड हा युवक तिचा नेहमी पाठलाग करत असे. मुलीच्या नातेवाईकांनीत त्याला समज देऊनही तो सुधरला नाही. ९ नोव्हेंबर रोजी त्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी एकटी असताना तिचा विनयभंग केला. तसेच त्याच्या मित्राने सदर मुलीला या बाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
अखेर मुलीने आणि तिच्या आई वडिलांनी गुरूवारी याबात पोलिसांत तक्रार दाखल केली. अद्याप आरोपींना अटक झाली नसून पुढील तपास सुरू आहे.


























































