बीडमध्ये आठ वर्षाच्या चिमुरडीवर पंधरा वर्षीय मुलाचा बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत एका खेडे गावात ८ वर्षीय चिमुरडीवर १५ वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोक्सो अंतर्गत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित मुलीवर अत्याचार करणारा मुलगा तिचा नातेवाईकच आहे.

पीडीत मुलगी व मुलगा नातेवाईक आहेत. त्यांचे वरच्यावर एकमेकांच्या घरी येणे जाणेही व्हायचे. शनिवारी रात्री पीडित मुलगी मुलाच्या घरी गेली होती. उशीर झाल्याने ती तिथेच झोपली. त्यानंतर सकाळी मुलीने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यावरून तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टकसाळ पुढील तपास करीत आहेत.