हद्द झाली.. आता तलावच चोरला

561

 

मीरा- भाईंदर पालिका क्षेत्रातील मौजे वरसावे गाव… येथील 8 गुंठे जमिनीच्या साताबारावर दिसणारा अख्खा तलावच चोरीला गेला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठय़ासाठी हा तलाव राखीव असल्याने आमचा चोरीला गेलेला तलाव शोधून द्या, अशी हाक मारत येथील गावकऱयांनी थेट पालिका गाठली आहे. धक्कादायक म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी बिरुदे मिरवणाऱया भाजपच्या माजी आमदारानेच ही जादुई लीलया करून हा तलाव ‘गडप’ केल्याची तक्रार पालिका आयुक्तांकडे दाखल झाली आहे.

जगात जे घडू शकत नाही ते मीरा-भाईंदर शहरात लीलया घडू शकते याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. येथील करसाके गाकातील एक अख्खा तलाक चक्क चोरीला गेला आहे. हा कारनामा दुसऱ्या कुणी नव्हे तर कांदळवनाची कत्तल करून सेव्हन स्टार हॉस्पिटल बांधणाऱ्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. गावातील सार्वजनिक पाणी तलावासाठी राखीव असलेल्या सर्व्हे क्रमांक 90 येथील 8 गुंठे जमिनीवर नरेंद्र मेहता यांनी मातीचा भराव टाकून तलाव ढापला असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सचिक आत्माराम काघे यांनी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला आहे. यासंदर्भात येथील स्थानिक आदिवासींनी एप्रिल 2016 मध्ये तक्रारसुद्धा केली होती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तलाव नव्हताच कधी

ब्रिटिशकाळापासून करसावे गावात तलावच नव्हता. येथे पूर्वी शेती व्हायची, मात्र कालांतराने तीसुद्धा बंद झाली. उलट येथे असलेल्या आपल्या खासगी जागेत पावसाचे पाणी अडकून तलाव बांधला असल्याचे स्पष्ट करून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या