Mithun chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना काल छातीत दुखू लागल्य़ाने कोलकात्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून आता त्यांना आयसीयूमधून त्यांना सामान्य कक्षात आणण्यात आले आहे. अभिनेत्री देबाश्री रॉय रुग्णालयात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भेटायला गेली होती, त्यांनंतर तिने त्यांच्या तब्येतीची बातमी दिली.

देबाश्री रॉयने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मी मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात भेटायला गेले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना वेळेत रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची रक्तातील साखर कमी झाली होती, त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. मात्र आता त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षेत आणण्यात आले आहे आणि आता ते रुग्णालयात आराम करत आहेत. फिल्म निर्माते पथिकृत बासू यांनी सांगितले की, मी आता रुग्णालयात आलो आहे. मी मिथुन दा यांना भेटलो आणि आता ते बरे आहेत. मिथुन दा यांनी काही दिवसांनी पुन्हा शुटींग करु असेही सांगितले. ते पुन्हा सेटवर आल्यावर काय करतील तेही त्यांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले.

शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने इस्केमिक सेरेब्रोवास्कुलर ब्लॉकेज असल्याची माहीती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांनी तब्येत स्थिर असल्याचीही माहिती दिली होती.