आंदोलकांविरोधातील कारवाई तत्काळ थांबवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीजेपीचे आंदोलन चिरडणाऱ्या केंद्रातील सरकारवर द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी जोरदार हल्ला केला. देशातील तरुणांनी केंद्र सरकारवर असहमती दर्शवणे म्हणजे गुन्हा नाही. लोकशाहीत लोकांचा आवाज दाबून ठेवता येत नाही. सरकारने आंदोलकांविरोधातील कारवाई थांबवावी, अशी मागणी स्टॅलिन यांनी केली.

दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली, त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे 1975-77 च्या आणीबाणीची आठवण करून देणारी आहे. दिल्ली आणि देशातील सर्व भागांत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व राजकीय नेते, विद्यार्थी, तरुणाईची तत्काळ सुटका करा, असेही ते म्हणाले.