फायद्यासाठी विखे कुठेही जातील! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balasaheb-thorat

सामना प्रतिनिधी । संगमनेर

काँग्रेस पक्षाने विखे परिवाराला गेल्या पन्नास वर्षांपासून मागेल ती सत्तेची पदे दिली. त्यावरच विखेंच्या संस्था उभ्या राहिल्या. मुलाने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणे हा बालहट्ट आहे की काही निश्चित धोरण, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. पण मागील अनुभव पाहता फायद्यासाठी विखे कुठेही जातील, असे टीकास्त्र काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोडले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, युवक काँग्रेसची पदे असतानाही पक्ष सोडला जातो ही कृती ठरल्याप्रमाणे स्टॅटेजी असावी असे वाटते. यापूर्वीही विखे पिता-पुत्र शिवसेनेत गेले होते. शिवसेनेनेही त्यांना मंत्रीपदेही दिली. मात्र शिवसेनेलाही फसवून विखेंनी आपला रंग दाखवला. विरोधी पक्षनेते पद असतानाही मागील पाच वर्षांच्या काळात राधाकृष्ण विखेंनी फक्त शिवसेनेवर टीका केली. यातूनच त्यांची भाजपशी जवळीक समजून येते, अशी टीका थोरात यांनी केली.