
मुंबईतील साखळी बाँम्बस्फोटातील सूत्रधार व कुख्यात दाऊद इब्राहिमला कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थानात आणा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कुख्यात दाऊद इबाहिम पाकिस्तानमधील कराचीमध्ये लपून बसल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. त्यामुळे कोणताही किंमत मोजून दाऊदला भारतात आणावे. दाऊदला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी विनंती रोहित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
पाकिस्तानचे घुमजाव
दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याची कबुली पाकिस्ताने दिली. दहशतवादी कारवायांसाशी संबंधित 88 जणांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात दाऊद इब्राहिमसह अन्य काही दहशतवाद्याची नावांचा समावेश आहे मात्र पाकिस्तानने काही तासातच घुमजाव करीत दाऊद इब्राहिम कराचीत नसल्याचा खुलासा केला आहे.

























































