मेट्रोच्या 12 हजार कोटींच्या 19 डेंटर्सना सरकारची मंजुरी, पायाभूत सुविधांच्या दिशेने एक पाऊल

मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक जलद करण्यासाठी एमएमआरडीएने आज तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या 19 टेंडर्सना मंजुरी दिली आहे. त्यातून मेट्रो सेवेचे मोठे जाळे विस्तारण्यात येणार आहे.

एमएमआरडीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्याचवेळेस मेट्रो मार्ग तसेच अटल सेतूसह विविध महत्वाच्या कामांसाठी पंत्राटदारांच्या नियुक्तीसाठीही मंजुरी देण्यात आली. यातून रोलिंग स्टाँक, नागरी कामे, ट्रँक्शन पाँवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा व मल्टी मोडल इंटिग्रेशनच्या कामाचा समावेश आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस म्हणाले की, राज्य सरकार भविष्यातील मागण्यांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली 12 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक व समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.