पुण्यातील मनसेची प्रचार शुभारंभ सभा रद्द

1463

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील प्रचार शुभारंभाची सभा रद्द करण्यात आली आहे. नऊ ऑक्टोबर अर्थात आज बुधवारी होणारी राज ठाकरे यांची सभा मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राज यांची सभा कसबा मतदारसंघातील सरस्वती मंदिर संस्थेच्या नातूबाग मैदानावर होणार होती.

मनसेने कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांची बुधवारी सभा होणार होती.

mns

पुण्यात मुसळधार
पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरू आहे. परतीच्या पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावल्याने सरस्वती मंदिर संस्थेच्या नातूबाग मैदानावर पाणी साचले आहे. याच कारणाने सभा रद्द करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या