
मोबाईलसह मोटरसायकल चोरीच्या गुह्यात एकाला अंबोली पोलिसांनी अटक केली. अर्जुन ऊर्फ राजू सहानी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोटारसायकल आणि अकरा चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हा डिलिव्हरी बॉय असून तो अंधेरीच्या लोखंडवाला येथे राहतो. त्याची मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरली होती. घडल्या प्रकरणी त्याने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला होता. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, उप निरीक्षक प्रदीप फुंदे, विक्रम पुंभार, यादव, मोरे, चव्हाण, साखरे, नरळे याच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून अर्जुनला ताब्यात घेतले. अर्जुनविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत 16 मोटरसायकल आणि मोबाईल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोटरसायकल आणि 11 मोबाईल असा साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला.























































