मोबाईल रिचार्ज दुपटीने महागणार

5840

लॉकडाऊनमुळे आधीच हैराण झालेल्या देशातील कोटय़वधी मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज दुपटीने महागण्याची शक्यता आहे. पुढील एक-दीड वर्षात सर्व रिचार्ज प्लॅन्स दोन वेळा महाग होतील असे सांगण्यात येते.

कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपन्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पुढील सहा महिन्यांमध्ये रिचार्जचे दर वाढवले नाहीत तर या कंपन्यांना तग धरणे कठीण होईल असा इशारा दळणवळण क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे. तातडीने रिचार्ज महाग होणार नाहीत तर पुढील सहा महिन्यांमध्ये मोबाईल कंपन्या याबाबत निर्णय घेऊ शकतात असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या