पुणे – बंगल्यातून वैद्यकीय अधिक्षकांच्या सासऱ्यांचा मोबाईल चोरीला

येरवड्यातील मनोरूग्ण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांच्या बंगल्यातून चोरट्यांनी त्यांच्या सासऱ्याचा मोबाईल चोरून नेला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी बंगला क्रमांक एकमध्ये घडली आहे. याप्रकरणी विनोद पायमपल्ली (वय 47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद येरवड्यातील मनोरूग्ण रूग्णालयात कामाला आहेत. रूग्णालय परिसरात वैद्यकीय अधीक्षक डॉ. फडणीस यांचा बंगला आहे. मागील एक महिन्यांपासून त्यांचे सासरे डॉ. फडणीस यांच्याकडे राहायला आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचे सासू-सासरे दार लावून झोपले असता, चोरट्यांनी त्यांचा मोबाईल आणि रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वारंगुळे तपास करित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या