सराईत मोबाईल चोरटा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पहाटेच्या वेळेस रिक्षाचालकाचा जबरीने मोबाईल चोरून नेणार्‍याला खार पोलिसांनी अटक केली. फरहान गुलजार खान ऊर्फ बाबा असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात 11 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हे रिक्षाचालक आहेत. चार दिवसांपूर्वी खार येथे पहाटे ते रिक्षात बसले होते तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या एकाने रिक्षाचालकाचा जबरीने मोबाईल चोरून पळ काढला. तक्रारदारांनी या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून फरहानला अटक केली. फरहानविरोधात मेघवाडीत 6, जोगेश्वरीत 2, वनराई आणि डी. एन. नगर येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे घातक शस्त्र घेऊन आलेल्याला खार पोलिसांनी अटक केली. सलीम अली कुरेशी असे त्याचे नाव आहे.