सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील ओशिवरा भागात एका मॉडेलने दारूच्या नशेत अंगावरचे कपडे काढल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिसांसमोर तिने हा सर्व लज्जास्पद प्रकार केला होता. मेघा शर्मा असे या मॉडेलचे नाव असून तिने आपण तसे कृत्य का केले याबाबत खुलासा केला आहे.
त्या रात्री काय झालं?
मॉडेल मेघा शर्माने मीडियाशी बोलताना सांगितले की, त्या रात्री मी वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. परंतु त्याने मी ड्यूटीवर असल्याने जाणार नाही असे उत्तर दिले. मी त्याला दुसऱ्या वॉचमनला सिगारेट आणून दे असे बोलण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला. त्यानंतर त्याने एका सिगारेट वाल्याचा मला नंबर दिला आणि फोन करण्यास सांगितले. परंतु रात्र जास्त झाल्याने मी त्याला फोन न करता स्वत: सिगारेट आणण्यासाठी गेले. बाहेर तीन-चार वॉचमन असतानाही मला सिगारेट आणण्यासाठी जावे लागले. मी त्यांना याबाबत सुनावल्यावर त्याने अपशब्द वापरले आणि ‘चारित्र्यहीन मुलगी’ असा माझा उल्लेख केला.
सिगारेटच्या घटनेनंतर वॉचमनने पोलिसांना फोन केला. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या. या सर्व गोंधळात काय करावे मला सुचले नाही, असे मॉडेलने सांगितले. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं. तेव्हा पोलीस निघून गेले, असेही तिने सांगितले. ते माझ्यावर बलात्कार करणार नाही ना किंवा माझी हत्या करणार नाही ना? या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले.
#WATCH: Model Megha Sharma, who in a viral video was seen thrashing a security guard and sitting in protest when the police came to take her, narrates the chain of events which took place at the time of the incident. #Mumbai pic.twitter.com/iWvHHVH9Mu
— ANI (@ANI) October 30, 2018






























































