
थर्ड डीग्रीचे दिवस गेले आता पोलीस तपासांत वैज्ञानिक पुरावे आणि साक्षींचा आधार घेतला पाहिजे असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. तसेच केंद्र सरकार IPC, CRPC आणि IEA मध्ये अमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे असे संकेत शहा यांनी दिले.
मेरे लिए हर्ष का विषय है कि जब गुजरात फोरेंसिक सांइस यूनिवर्सिटी बनी तब मोदी जी गुजरात के मुख्यमंत्री थे व मैं गृह मंत्री और जब वो NFSU बनी तो मोदी जी देश के प्रधानमंत्री हैं व मैं गृह मंत्री।
देश के क्रिमिनल जस्टिस सिस्टम को सशक्त व परिणामलक्षी बनाने हेतु मोदी सरकार कटिबद्ध है। pic.twitter.com/44obbzrC0Y
— Amit Shah (@AmitShah) July 12, 2021
सोमवारी अमित शहा गांधीनगरमध्ये बोलत होते. शहा म्हणाले की, हिंदुस्थान सरकार भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यात अमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. या कायद्यात अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या असून हा कायदा कालसुंसंगत करण्याचा आमचा मानस आहे. परंतु या कामात अनके आव्हानं आहेत. या कायद्यात अनेक कलम जोडली जावे असा अमचा प्रयास आहे, असे शहा म्हणाले.
थर्ड डीग्रीचे दिवस गेले असे शहा म्हणाले. तसेच आता चौकशीसाठी वैज्ञानिक प्रमाण वापरून गुन्हेगाराकडून गुन्हा कबुल करता येईल त्यासाठी फॉरेन्सिकशी निगडीत सर्व कामे व्यवस्थित झाली पाहिजे असेही शहा म्हणाले. हल्ली पोलिसांवर दोन प्रकारचे आरोप होतात. पहिला आरोप हा की पोलीस काहीच कारवाई करत नाही. आणि दुसरा आरोप की पोलीस जास्तच सक्त कारवाई करत आहे. आम्हाला सामान्य कारवाईची अपेक्षा आहे. जेव्हा आपण आपल्या चौकशी आणि तपासात वैज्ञानिक प्रमाणाचा वापर करू तेव्हा चौकशी सामान्य पद्धतीची होईल. त्यासाठी थर्ड डीग्रीची गरज नसून आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीवर योग्य प्रकारे कारवाई होईल असे मत शहा यांनी व्यक्त केले.





























































