मोदी दिवाळीआधी पुन्हा केदारनाथच्या गुंफेत जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवित्र केदारनाथ तीर्थक्षेत्राला बर्फाच्या चादरीने वेढायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी पुन्हा केदारनाथ गुंफेला भेट देणार आहेत. याआधी 2019च्या लोकसभा निवडणूक निकालाआधी मोदी यांनी केदारनाथ गुंफेत भेट देत तिथे काही तास ध्यानसाधना केली होती. पंतप्रधानांच्या या अनपेक्षित भेटीनंतर केदारनाथ ध्यान गुंफांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या गुंफांची बुकिंग भक्तांनी मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली आहे.