मोदींच्या ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ला 360 कोटी व्ह्यूज

1683

डिस्कवरी चॅनेलवर साहसवीर बेयर ग्रिल्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ शो 12 ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. तेव्हापासून हा शो सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. तो सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करणारा शो बनला आहे. ट्विटरवाला शोला जगभरातून 360 कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. मोदींच्या या एपिसोडने प्रसिद्ध शो सुपर बाउल 53 ला मागे टाकले आहे.

बेयरचा ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ शो खूप प्रसिद्ध आहे. जंगलवाटा तुडवत अत्यंत साहसाने प्रवास करणारा बेअर पंतप्रधान मोदी यांच्यासह जिम कार्बेटच्या राष्ट्रीय उद्यानात फिरला. त्यावेळच्या प्रसंगावर आधारित शो नुकताच डिस्कवरीवर दाखवण्यात आला. यामध्ये मोदी नव्या रूपात प्रेक्षकांना दिसले. 180 पेक्षा अधिक देशांमध्ये शोचे प्रसारण झाले. शोचा होस्ट बेअर यामुळे खूप खूश झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या