अतिउत्साहाच्या भरात प्रेक्षक घसरले.. शमी मैदानात उतरताच दिले जय श्रीरामचे नारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Boarder Gavaskar Trophy) खेळवली जात असून, अहमदाबादच्या स्टेडियममध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दोन्ही दिवशी ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबरोबर एक घटना घडली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचे सर्व खेळाडू चाहापानानंतर मैदानावर पुन्हा परतत होते. यावेळी संपूर्ण टीम बाऊंड्री लाईनजवळ उभी होती. सूर्यकुमार यादवला पाहताच स्टेडियममधील लोकं सूर्या सूर्या ओरडू लागले. यावेळी सूर्याने त्यांना हात जोडून अभिवादन केलं. यावेळी सूर्याच्या बाजूला मोहम्मद शमी देखील उभा होता. सूर्याच्या नाऱ्यानंतर प्रेक्षकांनी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम असे देवाचे नारे देणं सुरु केलं. ही गोष्टी तेव्हा अती झाली जेव्हा, प्रेक्षक शमीचं नाव घेऊन जय श्री राम ओरडू लागले.

प्रेक्षकांचं हे वागणं अयोग्य
प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये घडलेलं हे दृश्य क्रीडाप्रेमी आणि मुस्लिम खेळाडूसाठी खूपच अस्वस्थ करणारं होतं. यावेळी प्रेक्षकांच्या या नाऱ्यांकडे दुर्लक्ष करत शमीने मैदानाकडे निघून गेला.

ऑस्ट्रेलिया टीम 480 रन्समध्ये ऑलआऊट
चौथ्या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन टीमचं वर्चस्व दिसून आलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्या डावामध्ये 480 रन्स केले. कांगारूंच्या पहिल्या इंनिंगमध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी शतकी खेळी खेळली. ख्वाजा 180 तर ग्रीन 114 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. मुख्य म्हणजे या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 208 रन्सची पार्टनरशिप केली. टीम इंडियाकडून स्पिनर रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक म्हणझेच 6 विकेट पटकावल्या. तर मोहम्मद शमीला 2 विकेट्स घेण्यात यश आलं आहे