मोहम्मद कैफ देशद्रोही, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मोहम्मद कैफ याने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपचे केशव प्रसाद मौर्य यांनी त्याचा पराभव केला हो

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याला ट्विटरवरून पाकिस्तान क्रिकेट संघाची स्तुती करणं चांगलंच महागात पडलं आहे. पाकिस्तानची स्तुती केल्यामुळे नेटकऱ्यांनी कैफला धारेवर धरत त्याला देशद्रोही ठरवलं आहे.

पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियामधील टी-२० च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत या मालिकेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तनाचा फखार झमान याने ४६ चेंडूत ९१ धावा केल्या. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीचे आणि पाकिस्तानच्या टीमचे कैफने ट्विटरवरून कौतुक केले. कैफच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. काहींनी कैफला देशद्रोही म्हटले तर काहींनी त्याच्याकडून पाकिस्तानच्या स्तुतीची अपेक्षा नसल्याचे म्हटले. कैफकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.