
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर न्यूझीलंडमध्येही टीम इंडियाचे जबरदस्त प्रदर्शन सुरुच आहे. नेपियारमध्ये हिंदुस्थानने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारत मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद शमीने दमदार प्रदर्शन करत बळींचे शतक पूर्ण केले. या सामन्यात शमीने 19 धावात 3 बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर त्याने सामनावीरचा पुरस्कारही पटकावला.
100 ODI wickets and counting for @MdShami11 #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/3RVvthg1CH
— BCCI (@BCCI) January 23, 2019
शमीने सुरुवातीलाच न्यूझीलंडला दोन तगडे झटके दिले आणि हिंदुस्थानकडून सर्वात वेगवान 100 बळी घेण्याचा विक्रम केला. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल शमीचा 100 वा बळी ठरला. शमीने 56 व्या सामन्यात 100 बळींचा टप्पा गाठला. शमीने इरफान पठानचे विक्रम मोडला. इऱफानने 59 सामन्यात 100 बळींचा टप्पा गाठला होता. यासह माजी खेळाडू झहीर खानने 65, अजित आगरकर याने 67 आणि जवागल श्रीनाथने 68 सामन्यात अशी कामगिरी केली होती.
Mohammed Shami after becoming fastest Indian bowler to complete 100 ODI wickets:It has been a long journey,especially when I played World Cup. It took me 2 yrs to recover from injury.After long process,I gained confidence&performed better.I’ll continue to perform this way.#INDvNZ pic.twitter.com/MaFkbleQwt
— ANI (@ANI) January 23, 2019
दरम्यान, पहिल्या सामम्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराट कोहली 45 आणि शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या बळावर टीम इंडियाने या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
























































