मोहम्मद शमीच्या घराबाहेर रांग का लागायला लागली ? तपासणीशिवाय प्रवेश नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वचषक 2023 च्या अंतीम सामन्यात हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. पण, संपूर्ण विश्वचषकात जबरदस्त गोलंदाजी करुन  क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली ती मोहम्मद शमीने. विश्वचषक 2023 मध्ये अंतिम सामना सोडला तर हिंदुस्थानने संपुर्ण विश्वचषकात वर्चस्व गाजवले. आक्रमक फलंदाजी, धारधार गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या जोरावर हिंदुस्थानचा संघ वरचढ ठरला. पण, या विश्वचषकाच्या रणधुमाळीत सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीने. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये शमीला संधी मिळाली नव्हती. पण, उर्वरीत 7 सामन्यांमध्ये 5.26 च्या सरासरीने त्याने 36 बळी घेतले आणि विश्वचषकातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा बहुमान त्याने पटकावला.

विश्वचषकात केलेल्या चमकदार कामगीरीनंतर मोहम्मद शमीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागत आहेत. एक व्हिडीओ शमी याने इन्स्टाग्रावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मोहम्मद शमीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. या चाहत्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातोय.

चाहत्यांचे मोहम्मद शमीवर असणारे प्रेम वाढत चालले असून, या प्रेमासोबत त्याच्या घराबाहेरील रांगही वाढू लागली आहे.  मोहम्मद शमीने एका हिंदी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की ,” आता गर्दी थोडी कमी आहे. सकाळी चाहत्यांनी खूपच जास्त गर्दी केली होती. असं वाटत होतं की मी निवडणुकीला उभा आहे. शमी भाईचा विजय असो, शमी भाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत.”

तो पुढे म्हणतो की, “एक काळ होता जेव्हा मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. पण आता असले विचार माझ्या मनात येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग एकदा तरी येतो. मागच्या गोष्टींचा मी विचार करत नाही. मी वर्तमानात जगतो आणि वर्तमानातच मी आनंदी आहे.