
थंडावा किंवा आर्द्रतेमुळे घरातील भिंतींवर बुरशी जमा होते. अशा वेळी सोपे घरगुती उपाय करता येतात. पांढरा व्हिनेगर एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरून बुरशी लागलेल्या कोपऱयांमध्ये स्प्रे करा. मीठ आणि तुरटीच्या पाण्याचा स्प्रेदेखील करता येईल.
ओल्या भिंतींवरही सोडा लावून घ्यावा. घराच्या ओलसर कोपऱयामध्ये कडुलिंबाची पाने ठेवा किंवा पाण्यात कडुलिंबाचे तेल मिसळून त्या पाण्याने घर पुसून घ्या. घराच्या खिडक्या उघडय़ा ठेवा. हवा खेळती राहिल्यामुळे ओलावा राहत नाही.


























































