
पाणीपुरी म्हणजे अनेकांच्या जिव्हाळय़ाचा विषय. आंबट, गोड, तिखट अशा पाणीपुरीची चव तोंडात रेंगाळत राहते. पाणीपुरीची चव आठवताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. या पाणीपुरीचे वेड माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही लागले आहे. एका माकडाचा पाणीपुरी खातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @GawaiGajanan या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ गुजरातच्या टंकारा येथील दयानंद चौकातील एका पाणीपुरी स्टॉलवरचा आहे. माकडाचा पाणीपुरी खातानाचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. युजर्स त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.