मथुरेत माकडाने पळवली 20 लाखांची बॅग

मथुरेतील वृंदावन येथे एका माकडाने व्यापाऱ्याच्या हातातील बॅग पळवली. या बॅगेत 20 लाख रुपये किमतीचे दागिने होते. अभिषेक अग्रवाल असे या व्यापाऱ्याचे नाव असून ते ठाकूरजींची फूल-बांगला सेवेसाठी कुटुंबासह आले होते. दर्शनाच्या वेळी अभिषेक यांच्या पत्नीने दागिने काढून बॅगेत ठेवले. अचानक एका माकडाने त्यांच्या हातातून बॅग हिसकावून तेथून पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर बॅग झुडपात पडलेली आढळली. पोलिसांनी ही बॅग मालकाला परत केली.