मोनोरेलचे डबे बनविण्याच्या शर्यतीत तीन देशी कंपन्या

596
mumbai-monorail-001

मोनोरेल सध्या ‘प्रॅक्टीस रन’ करीत असली तरी तिच्यासाठी नव्या दहा गाडय़ांचे डबे बांधण्यासाठी तीन देशी कंपन्यांनी इंटरेस्ट दाखविला आहे. नुकतेच मोनोरेलचे दहा गाडय़ांच्या डबे तयार करण्यासाठी चीनच्या दोन कंपन्यांना दिलेले पाचशे कोटींचे कंत्राट ऐनकेळी अटी शर्थींचे उल्लंघन केल्याने एमएमआरडीएने रद्दबातल केले होते. आता नव्याने निविदा काढण्यात येणार असून त्यात भारत हेव्ही इलेक्ट्रीकल्स लि. ‘भेल’, भारत अर्थ मुव्हर्स लि.‘बीईएमएल’ आणि तितागढ वॅगन लिमिटेड ‘टीडब्ल्यूएल’ या तीन कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मेट्रो लाइन 2 आणि 7 डबेही बीईएमएल कंपनीच बनवित आहे.

गेल्यावर्षी मोनोरेलच्या दहा ट्रेनसाठी एमएमआरडीए जागतिक निविदा मागविल्या होत्या. रेखांकन, उत्पादन आणि पुरवठय़ासाठी चायना रेल रोड कॉर्पेरेशन, बिल्ड युवर ड्रीम्स आणि एका अमेरिकन कंपनीने निविदा भरल्या होत्या. चायनीज कंपन्यांनी निविदा पात्रतेच्या अटी व शर्थीत बदल करण्यास सांगितल्यानंतर भविष्यात डब्यांच्या पुरवठय़ासंदर्भातील परावलंबित्व टाळण्यासाठी या चिनी कंपन्यांच्या निकिदा रद्द करण्यात आल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या