‘मोनो डार्लिंग’ उद्यापासून पुन्हा सेवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

सामना प्रतिनिधी, मुंबई

बहुप्रतीक्षित मोनो रेल 1 सप्टेंबरपासून पुन्हा ट्रॅकवर येत आहे. वडाळा ते चेंबूर या पहिला टप्प्यावर मोनोची सेवा पूर्ववत सुरू होणार असून त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनो रेलच्या डब्यांना आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हापासून मोनो रेल बंद आहे.

आता 1 सप्टेंबरला वडाळा आणि चेंबूर अशा दोन्ही स्थानकांवरून पहाटे 6 वाजता पहिली मोनोरेल सुटणार आहे. ती रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दर 15 मिनिटांनी सुटणारी मोनो रेल दिवसाला 130 खेपा मारेल अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली.