आनंदवार्ता! दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळात वेळेपूर्वी दाखल झालेली मान्सून एक्सप्रेस यंदा वेगात धावत असल्याचे चित्र दिसून आले आहे. महाराष्ट्रात यंदा दोन दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला असल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली असून शनिवारी दक्षिण कोकणात हर्णे ते दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत मान्सूनने दणक्यात आगमन केले आहे. दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हवामान खात्याचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी आज मान्सूनच्या आगमनाची शुभवार्ता ट्विटच्या माध्यमातून जाहीर केली. यंदा वेळेअगोदरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक असल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या पावसाच्या आधीच शेत नांगरून पेरणीसाठी ते तयार असतात. त्यातच आता मान्सून दाखल झाल्याने शेतीच्या कामांना सुरुवात होणार आहे.