
कोरोना संकट काळातही संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हे सत्र आयोजित केले असून या दरम्यान एकही सुटी नसणार आहे. यापूवी मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने 14 सप्टेंबर रोजी सत्र बोलावण्याचे सुचवले होते. या सत्रात 18 बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
संसदेत पावसाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनाचे संकटात पहिल्यांदाच सत्र होणार आहे म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी बैठकीची तशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
साधारणतः दोन्ही सदनाचे कामकाज एकाच वेळी सुरू असतं. पण आता कोरोबामुळे एका सदनाचे कामकाज सकाळी तर दुसर्या सदनाचे कामकाज सांयकाळी होणार आहे. हिंदुस्थानी संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच 60 सदस्य सदनाच्या कक्षात, राज्यसभेत 51 तर 132 सदस्य लोकसभेच्या सदन कक्षात बसतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संपूर्ण तयारीचा आढावा घेतल्यानंतर सत्राला हिरवा कंदील दाखवला आहे. गेली दोन आठवडे संसदेचे कर्मचारी ही तयारी करत आहेत.
कोरोना साथरोगामुळे 23 मार्च रोजी दोन्ही संसद अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. नियमांनुसार दोन्ही सत्रांच्या मधोमध सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असता कामा नये


























































