चांगली बातमी – मान्सून 5 जून पर्यंत गोव्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सून अंदमानातून पुढे सरकून बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. मान्सूनला अशीच गती मिळत राहिल्यास 31 मेपर्यंत मान्सून केरळात पोहचू शकतो. त्यानंतर 4 ते 5 जूनपर्यंत तो गोव्यात दाखल होऊ शकतो, अशी माहिती गोवा हवामान खात्याने दिली.

मान्सून यंदा लवकर येईल, अशी शक्यता केंद्रीय हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार मान्सून काहीच दिवसांपूर्वी अंदमानात दाखल झाला आहे. तेथून मंगळवारी मान्सून बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पश्चिम तसेच दक्षिण-पूर्वेकडील भागात पोहोचला. सध्याचा वेग लक्षात घेतल्यास मान्सून 31 मेपर्यंत केरळमध्ये आणि 4 ते 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होऊ शकतो.

बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळामुळे मंगळवारी गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता राज्य हवामान खात्याने सोमवारी वर्तवली होती. पण मंगळवारी पाऊस झाला नाही. खात्याने बुधवारीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.