
सामना ऑनलाईन । श्रीनगर
पाकव्याप्त कश्मीरमध्ये 300 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी नियंत्रण रेषेपलीकडील उत्तर कश्मीरमध्ये 250 दहशतवादी लाँचिंग पॅडवर तयारीत आहेत आणि पाकिस्तानी लष्कर त्यांना मदत करीत आहे, अशी माहिती लष्कराच्या 15व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. बट यांनी दिली.
लष्करातर्फे केरन येथे आयोजित 15 दिवसीय मेळाव्याच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, दहशतवाद्यांना पकडण्याची आणि हाती येऊ न शकणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारण्याचे अभियान सुरू आहे. दहशतवाद्यांनी निवडणुकांमध्ये व्यत्यय आणू नये यासाठी राज्य पोलीस, सीआरपीएफ, लष्कर आणि अन्य सुरक्षा दले मिळून दहशतवाद्यांविरुध्द कार्यवाहीस तत्पर आहेत. ते म्हणाले, उत्तर कश्मीरमधील रहिवासी दहशतवाद्यांना आता आश्रय देत नाहीत. त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा डाव त्यांच्या लक्षात आलेला आहे.
summary- more than 250 terrorist are ready to infiltrate border



























































