
सामना प्रतिनिधी । मुंबई
भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. पाच महिन्यांत मुंबईत 36 हजार 431 जणांना कुत्रे चावले असल्याची बाब राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीत उघड झाली.
श्वानदंशावर ऑण्टिरेबीज लशीचा तुटवडा असल्याबाबत आमदार अमिन पटेल, अस्लम शेख, नसीम खान आणि निर्मला गावित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. राज्यमंत्री योगेश सागर यांनी यासंदर्भात कंत्राटदाराने पुरवठा थांबवलेला नाही, असे मुंबई महापालिकेने कळवल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर नसीम खान, अतुल भातखळकर यांनी किचारलेल्या उपप्रश्नांना उत्तर देताना सागर म्हणाले की, जानेवारी ते मे 2019 या काळात मुंबईत 36 हजार 431 नागरिकांना श्वानदंश झाला आहे. एप्रिल या केवळ एका महिन्यात 10 हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावल्याचे प्रकार मुंबईत घडले आहेत, असेही सागर यांनी सभागृहाला सांगितले. मात्र लस उपलब्धता अल्पकाळासाठी विशिष्ट भागातच बाधित झाली होती. केवळ 10 ते 20 जानेवारी 2019 या दहा दिवसांच्या कालावधीत रेबीजविरोधी लसींचा तुटकडा होता आणि तोही फक्त मुंबईतल्या एका भागात. लसपुरवठा करणाऱया संबंधित कंत्राटदार संस्थेला गुणवत्ताविषयक चाचण्या करून घेण्यास उशीर लागल्याने लसींचा पुरवठा या दहा दिवसांत होऊ शकला नाही. मात्र, मुंबईत अन्यत्र हा पुरवठा सुरळीत होता, असेही सागर यांनी स्पष्ट केले. संबंधित कंत्राटदाराकर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही सागर यांनी स्पष्ट केले.
कुत्र्यांचा चावा
जानेवारी 7378
फेब्रुवारी 4664
मार्च 8036
एप्रिल 10640
मे 5713


























































