हेल्मेट न वापरल्याने वर्षभरात 43,600 जणांचा मृत्यू

192

वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना सरकारने जे भुर्दंड लावले आहेत, त्याविरोधात काही राज्यांतील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. मात्र हेल्मेट न वापरता वाहन चालवणे हे दिवसागणिक किती जीवघेणे ठरत चालले आहे हे गेल्या वर्षभरातील आकडय़ांवरून दिसून येत आहे. 2018 मध्ये 43, 600 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. 2017 मध्ये 35,975 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. म्हणजे वर्षभरात मृत्यूचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढले आहे.

केवळ स्कूटर किंवा बाईक चालवणारेच नव्हेत तर त्यांच्या मागे डबल सीट बसणार्‍या लोकांचा मृत्यूचा आकडा 15, 360 एवढा आहे. अलीकडेच गुजरात आणि झारखंड या दोन राज्यांनी दुचाकीवर मागे विनाहेल्मेट बसणार्‍या व्यक्तींकडून पावती फाडण्यात येणार नाही, अशी अधिकृत घोषणा केली आहे.

  • उत्तर प्रदेशात विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍या 6,020 चालकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा सर्व राज्यांमध्ये जास्त आहे. महाराष्ट्रात 5,232 विनाहेल्मेट चालक अपघातात मरण पावले आहेत.
  • गुजरातमध्ये गेल्या वर्षभरात विनाहेल्मेट 958 दुचाकी चालकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांच्यामागे दुचाकीवर बसलेले 560 जणही मरण पावले आहेत.
  • झारखंडमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे 790 चालक आणि त्यांच्यामागील 450 जण मृत्युमुखी पडले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या