मोरोक्कन चाहते भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धक्कादायक निकालांची नोंद करीत जगज्जेतेपदासमीप पोहोचलेल्या मोरोक्कोचा प्रवास फ्रान्सने अखेर रोखला. मात्र मोरोक्कोचा पराभव त्यांच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. आपल्या हिंसक वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या मोरोक्कन चाहत्यांनी पराभवानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे प्रचंड गोंधळ घातला आहे. त्यांनी पराभवाचा राग काढताना ब्रसेल्सच्या एका पोलीस ठाण्याजवळ पोलिसांवर फटाके आणि कचऱयातल्या वस्तू फेकल्या. काही वस्तूंची जाळपोळही करून त्यांनी आपला राग व्यक्त केला. त्यानंतर चाहत्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या, लाठीचार्जही केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेकडो हिंसक चाहत्यांना ताब्यातही घेतले. पोलीस आणि चाहत्यांमध्ये चकमक उडाली असली तरी अद्याप कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.