सत्तांतराआधी अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेचा धडाका, ट्रम्प यांच्याकडूनच सर्वाधिक निर्णय

अमेरिकेत सत्तांतर होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला असताना दुसरीकडे मृत्युदंडाच्या शिक्षेचा धडाका सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने जुलै महिन्यापासून तेराव्या मृत्युदंडाला मंजुरी दिली. ट्रम्प पदावरून पायउतार होण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिलेला असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन मृत्युदंडाच्या विरोधात असल्याचे मानले जाते. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे डस्टिन हिग्ज याला मृत्युदंडाची शिक्षा मिळाली. शुक्रवारी हिग्ज याला मृत घोषित करण्यात आले. 1996मध्ये तीन महिलांची त्याने हत्या केली होती. या आठवडय़ातील ही तिसऱया मृत्युदंडाची शिक्षा आहे. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षी मृत्युदंडाच्या शिक्षेला पुन्हा सुरुवात केली. इतक्या मृत्युदंडाच्या शिक्षेला 120 वर्षांच्या काळात कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाने मान्यता दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या