
कोणीही व्यक्ती आपल्या स्वप्नातली पहिली कार खरेदी करताना सर्वातआधी गुगलवर ती सर्च करून पाहतो. तसेच ही कार सर्च करून, या कारची तुला इतर करशी करतो. यानंतरच ती कार खरेदी करायची की नाही, याचा निर्णय घेतो. मात्र तुम्हाला माहित आहे का 2021 या वर्षात गूगलवर सर्वताधिक कोणती कार सर्वाधिक सर्च केली गेली आहे? यात टाटा आणि मारुतीचा तर नक्कीच समावेश नाही. असे आहे तर मग कोणती आहे ही कार, चला तर जाणून घेऊ…
ऑस्ट्रेलियाच्या कम्पेअर द मार्केटने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात जगभरात सर्च केल्या गेलेल्या कारची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अहवालानुसार, हिंदुस्थानात सर्वाधिक जी कार सर्च केली गेली आहे, ती टाटा किंवा मारुती नसून Hyundai आहे. Hyundai ऑनलाईन खूपच प्रसिद्ध आहे. कंपनीने 2021 मध्ये आपले Alcazar आणि i20 N Line सारखे मॉडेल लॉन्च केले होते. यातच कंपनीचे सर्वाधिक सर्च होणाऱ्या मॉडेलमध्ये Hyundai Creta आणि Hyundai Venue बाजी मारली आहे.
जगात अव्वल Toyota
जगभरात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या कारबद्दल बोलायचे झाले तर यात Hyundai ला पछाडत जपानी कार निर्माता कंपनी Toyota ने बाजी मारली आहे. कंपनीच्या Fortuner, Innova ची हिंदुस्थानी बाजारातही चांगली पकड आहे. टोयोटा ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान आणि दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ऑनलाइन शोधांमध्ये आघाडीवर आहे.

























































