धक्कादायक! अंगाई गात आईने केली तीन मुलांची हत्या

1266
murder

एका महिलेने तिच्या तीन मुलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तीनही मुलं पाच महिने ते तीन वर्षांमधील होती. त्यातील सर्वात लहान मुलाला या आईने स्तनपान करून नंतर त्याचा गळा घोटल्याचे समजते. अमेरिकेतील फिनिक्स शहरात हा प्रकार घडला असून या प्रकरणी रॅचेल हेनरी (22) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

सदर महिला ही मानसिक आजारी असल्याचे समजते. गेल्या रविवारी म्हणजे 11 जानेवारीला सदर महिला तिच्या तीन मुलांसोबत घरात एकटी होती. त्यावेळी तिने सर्व प्रथम तिच्या दीड वर्षाच्या मुलीचा गळा आवळला. त्यावेळी तिच्या तीन वर्षाच्या मुलाने तिला थांबवायचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याच ऐकले नाही. त्यानंतर तिने तिचा मोर्चा त्याच्याकडे वळवला. मात्र आई आता आपल्याला मारणार हे लक्षात येताच तो मुलगा घरात पळू लागला. त्यावेळीच घरात काही पाहुणे आले. त्यांना पाहून मुलाने त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र त्याला अडवत तिने त्याला बेडरुममध्ये नेले. तिथे तिने मोठ्याने अंगाई गात त्याला झोपवत असल्याचे नाटक केले. त्या दरम्यान तिने त्याचा देखील गळा घोटून जीव घेतला. त्यानंतर ती तिच्या पाच महिन्याच्या मुलीला घेऊन पाहुण्यांसमोर आली. तिथे तिने पाच महिन्याच्या मुलीला स्तनपान केले. पुन्हा ती तिला घेऊन बेडरुममध्ये गेली व तिची देखील गळा घोटून हत्या केली. या दरम्यान आलेल्या पाहुण्यांना घरात काही विचित्र घडत असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. काही वेळाने पोलीस आल्यानंतर तिनही मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ते समजताच पाहुण्यांना धक्काच बसला. पोलिसांनी तत्काळ रेचेलला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या