दंडाचे सर्व विक्रम मोडले, वाहनचालकाला तब्बल 2 लाखांचा दंड

1925

केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन यांनी अपघात रोखण्यासाठी नवीन कायदा योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र नवीन नियमांनुसार दंडाची रक्कम प्रचंड असल्याने नागरिकांचा रोष आहे. आता दिल्लीतून एक बातमी आली असून दंडाचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत. येथे एका वाहनचालकाला तब्बल दोन लाखांचा दंड भरावा लागला आहे.

नवीन वाहतूक कायद्याला ‘या’ भाजपशासित राज्यांचा खो

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील एका ट्रक ड्रायव्हरला नवीन वाहतूक कायद्यानुसार दोन लाख पाचशे रुपयांचा दंड भरावा लागला. राम किशन असे या वाहनचालकाचे नाव आहे. मुबारक चौकात त्याला पकडण्यात आले. एक सप्टेंबरासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. तेव्हापासून हा दंडाच्या रक्कमेचा उच्चांक ठरला आहे.

अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ दिल्यास खिसा होणार रिकामा, वाचा काय आहे नियम

यापूर्वी राजस्थानमधील एका वाहनचालकाला दिल्लीमध्ये ओव्हर लोडिंगमुळे एक लाख 41 हजार 700 रुपयांचा दंड झाला होता. तर एका दुचाकीस्वाराला 15 हजारांच्या दुचाकीसाठी 25 हजारांचा दंड झाला होता. तसेच एका रिक्षाचालकाला 59 हजारांचा दंड झाला होता.

fine

आपली प्रतिक्रिया द्या