
तब्बल 71 सुरुंग तसेच कित्येक स्फोटक शोधून हजारो जणांचे प्राण वाचवणारा मागवा उंदीर नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. वयोमानानुसार त्याची सुरुंग शोधण्याची शक्ती कमी होऊ लागल्याने तो आता सेवानिवृत्त झाला आहे. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी टांझानिया येथील अपोपो ही संस्था 1990 सालापासून उंदरांना प्रशिक्षण देते. मागवाला तिथेच प्रशिक्षण दिले होते. येथे प्रशिक्षण घेतलेल्या उंदरांना ‘हिरो रॅट’ म्हणून संबोधले जाते.
मागवा या उंदराचे वजन 1.2 किलो असून तो फक्त 70 सेमीचा आहे. इतर उंदरांच्या जातीपेक्षा हा उंदीर हलका असतो. मागील वर्षी मागवाला पीडीएसए या संस्थेने सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते. या उंदराची खासियत म्हणजे टेनिस कोर्ट इतक्या मैदानातून तो अवघ्या 20 मिनिटांत सुरुंग शोधू शकतो.

























































