पावसामुळे कात्रज घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संततधार पावसामुळे कात्रज घाटात दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. डोंगर कपारीतून निखळेलला मोठा दगड घाट रस्त्यावर पडल्याने परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दगड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

कात्रज बोगद्यापासून काही अंतरावर दरड कोसळ्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, घाट रस्त्यात दगड पडल्याने वाहतूक काही विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलातील जवान सागर इंगळे हे पीएमपीएल बसने प्रवास करताना त्यांना रस्त्यावर दरड कोसळल्याचे दिसून आली. घटनेची माहिती त्यांनी त्वरीत अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.